आठ वर्षीय चिमुकलीचा छळ, आरोपी विवाहितेच्या आईची आत्महत्या

कोल्हापूर – प्रेमामध्ये अडथळा होत असल्याच्या कारणावरून आठ वर्षीय चिमुकलीला जन्मदाता पित्याने आणि तिच्या सावत्र आईने शारिरीक छळ करून तिला तापविलेल्या उलथन्याने चटके दिल्याची घटना उघडकीस आली होती. यानंतर आपल्या नातीचा होत असलेल्या छळामुळे धास्तावलेल्या आजीने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. स

रस्वती महादेव पाटील (वय 55, रा. रत्नदीप वसाहत, गंगानगर, कोरोची) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांनी राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. या घटनेची नोंद शहापूर पोलिसांत करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याप्रकरणामध्ये संबंधीत मुलीची सावत्र आई रेश्‍मा रमेश जगताप (मुळ रा. हसणे, ता.राधानगरी, सध्या रा.गंगानगर) ही आरोपी आहे. तिची आई सरस्वती महादेव पाटील हिने राहत्या घराच्या आतील खोलीत पहाटेच्या सुमारास गळफास घेवून आत्महत्या केली. या घटनेची माहिती समजताच शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेनासाठी येथील आयजीएम रुग्णालयात पाठविला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)