न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी


अटक केलेल्याच्या भावावरही दाखल आहे गुन्हा

पुणे – सिलेंडरचा स्फोट करून जीवे ठार मारण्याची धमकी देत आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत लैंगिक चाळे केल्याप्रकरणात 36 वर्षीय व्यक्तीला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. त्याला 1 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायाधीश आर.व्ही.अदोणे यांनी दिला आहे. या प्रकरणात पोलीस कोठडी सुनावलेल्या व्यक्तीच्या भावावरही गुन्हा दाखल आहे. सन 2012 ते 2018 या सहा वर्षाच्या कालावधीत ही घटना घडली.
फैय्याज सलीम अन्सारी (वय 36, रा. कोंढवा खुर्द) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. त्याचा भाऊ इम्ब्रोज याच्यावरही गुन्हा दाखल आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि इम्ब्रोज लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. त्यामुळे फैय्याज याचेही फिर्यादीच्या घरी जाणे-येणे होते. दोघांनी पीडित मुलगी एकटी असताना तिच्याशी लैंगिक चाळे केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी अटक करून फैय्याज याला न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्याच्या भावाचा शोध घेण्यासाठी, पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)