आठ महिन्यांत 30 गुन्हेगार तडिपार

शर्मिला पवार

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात परिमंडळ एक व दोनमधून तब्बल 30 सराईत आरोपींना तडिपार करण्यात आले असून 6 आरोपींच्या तडिपारीचे अहवाल अद्याप परवानगीच्या प्रतिक्षेत आहेत. आयुक्‍तालयांतर्गत सराईत गुन्हेगारांची यादी तयार करण्यात येत आहे. गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी मुख्यत्वे करुन तडिपारीची करावाई करण्यात येत आहे. सराईत गुन्हेगारांविरुद्ध तडिपार व महाराष्ट्र घातक कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत (एमपीडीए) कारवाईचे प्रस्ताव तयार करण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. त्यानुसार तडिपारीचे प्रस्ताव पोलीस ठाण्याद्वारे तयार करण्यात येत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यामध्ये 1 जानेवारी ते 29 ऑक्‍टोबर या अडीच महिन्याच्या कालावधीत परिमंडल एक मधील 14 तर परिमंडळ दोन मधील 16 आरोपींना तडिपार करण्यात आले आहे. तर परिमंडळ एक मध्ये पोलीस उपायुक्‍त स्मार्तना पाटील यांच्याकडे 3 आरोपींचे प्रस्ताव प्रस्तावीत आहेत. तर सहाय्यक पोलीस आयुक्‍त यांच्याकडे 6 प्रस्ताव चौकशी साठी प्रस्तावीत आहेत. तर सहाय्यक पोलीस आयुक्‍त चाकण यांच्याकडे 6 प्रस्तावीत आहेत. पोलीस उपायुक्‍त नम्रता पाटील यांच्याकडे 3 आरोपींचे प्रस्ताव चौकशीसाठी असून सहाय्यक पोलीस आयुक्‍त वाकड यांच्याकडे 6, सहाय्यक पोलीस आयुक्‍त देहुरोड यांच्याकडे 2 प्रस्तावीत आहेत.

यामध्ये दरोडा, विनयभंग, जबरी चोरी, प्रॉपर्टी विषयक गुन्ह्यांचा समावेश आहे. तडिपारीसाठी मात्र काही तांत्रीक मुद्दे व कागदपत्रांच्या अभावी कारवाईला थोडा विलंब होत असल्याचेही काही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी पोलिसांना केवळ तडिपार करुन गुन्हेगारीला आळा बसवून चालणार नाही, तर तडिपार आरोपींचा वावर ही पिंपरी-चिंचवड शहरात सरेआम होत आहे. त्यांच्यावर कारवाई करुनही ते परत हद्दीत दिसत आहेत. पिंपरी पोलिसांनी तडिपार केलेल्या आरोपीच्या हद्दीतच पिंपरी भागात बाल लैंगीक अत्याचारासारखा गंभीर गुन्हा घडला होता. तर “ससा’ या चिंचवडच्या तडिपार आरेपीने तडिपारी संपताच भर दिवसा चौकात गाड्या फोडल्या होत्या. त्यामुळे तडिपार आरोपींच्या वेळीच मुसक्‍या आवळणे गरजेचे आहे.

परिमंडल एक मधील तडिपार आरोपी
पिंपरी – 2
चिंचवड – 5
भोसरी -1
एमआयडीसी भोसरी -2
दिघी -4
एकूण – 14
—————
परिमंडल दोन मधील तडिपार आरोपी
सांगवी – 5
वाकड – 10
हिंजवडी – 1
एकूण – 16.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)