आठ पथकांद्वारे धान्य काळाबाजारावर ठेवणार “नजर’

अवर सचिव असणार प्रमुख : लाभार्थ्यांना देणार भेटी

पुणे – रेशन धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी ई-पॉस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, हे प्रकार विविध मार्गाने सुरूच होते. त्यामुळे काळाबाजार रोखण्यासाठी राज्यस्तरावर आठ पथके स्थापन केली आहेत. या पथकांमार्फत विविध बाबींची तपासणी करण्यात येणार आहे.

-Ads-

सार्वजनिक वितरण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी शिधापत्रिका आधार क्रमांकाशी लिंक करण्यात आले असून, ई-पॉस यंत्रणेमुळे शिधापत्रिधारकांना राज्यात कुठेही धान्य घेता येते. मात्र, काही रेशन दुकानदार कमी धान्य देऊन पावती देत नसल्याचे प्रकार समोर आले आहेत. अशा प्रकारे धान्याचा काळाबाजार केला जात आहे. तो रोखण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने राज्यस्तरावर अंमलबजावणी पथके स्थापन केली आहेत. अवर सचिव हे पथकाचे प्रमुख असून, कक्ष अधिकारी, सहायक कक्ष अधिकारी, तालुका स्तरावर पुरवठा अधिकारी किंवा नायब तहसीलदार हे पथकाचे सदस्य असणार आहेत.

हे पथक शिधापत्रिकाधारकांच्या घरी भेट देऊन लाभार्थ्यांना मिळालेल्या धान्याचा दर्जा, धान्याचा दर, किती तारखेला धान्य मिळाले, दुकानदार लाभार्थ्यांना पावती देतो की, नाही याची शहानिशा करणार आहेत. त्यामुळे जे दुकानदार लाभार्थ्यांना कमी धान्य देऊन त्याचा काळाबाजार करत असेल असे प्रकार उघड होणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)