आठ तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला

राजगुरूनगर-येथे एसटी बसमधून उतरताना एका 38 वर्षीय महिलेच्या पर्समधील आठ तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली असून अज्ञात चोरट्याविरोधात खेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजगुरुनगर येथील एसटी बसस्थानकात महिलांच्या दागिन्यांच्या चोरीच्या घटनेत वाढ होत असून, ऐन लग्नसराईत महिलांच्या किमती दागिन्यांवर अज्ञात चोरटे डल्ला मारत असल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बस स्थानकात सीसीटीव्ही बसविण्याची व पोलीस ठेवण्याची मागणी वारंवार नागरिक करीत आहेत. अपुऱ्या मनुष्य बळामुळे येथे पोलीस उपलब्ध होत नसल्याचा फायदा अज्ञात चोरटे पुरेपूर उठवत असून महिलांच्या किमती दागिने हातोहात लांबविण्याचे प्रकार दिवसागणिक घडत आहेत. सध्या सर्वत्र लग्नसराई असल्याने एसटी बसगाडीला मोठी गर्दी होत आहे, याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरटे चोरी करीत आहेत. शनिवारी (दि. 28) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गावडेवाडी (ता. आंबेगाव) येथील 38 वर्षीय महिला राजगुरुनगर येथील बसस्थानकात एसटी बसमधून उतरत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी या महिलेच्या हातातील पर्सची चैन उघडून त्यातील सोन्याचे गंठण (1 लाख 12 हजार), सोन्याचा राणी हार (60 हजार रुपये) असे एकूण 1 लाख 72 हजार रुपयांचा सोन्याच्या दागिन्यांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. याबाबत संबंधित महिलेने खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खेड पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)