आठव्या मजल्यावरून उडी मारून चौदा वर्षीय मुलीची आत्महत्या

मुंबई – मुंबईच्या कांदीवली उपनगरात राहणाऱ्या एका चौदा वर्षीय मुलीने आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार काल रात्री घडला. त्या परिसरातील ठाकुर गावातील गार्डेनिया कोऑप हौसींग सोसायटीच्या इमारतीतील आठव्या मजल्यावरून तिने हा प्रकार केला.

हर्षिका धिरेंद्र मायावशी असे या मुलीचे नाव आहे. ही मुलगी त्याच इमारतीतील पाचव्या मजल्यावर राहाते. ही मुलगी आठव्या मजल्यावरील कठड्यावर चढली तेव्हा काहीं जणांनी तिला पाहिले आणि त्यांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण तिने त्यांची सूचना डावलून वरून थेट उडी मारली. ती खाली पडल्यानंतर तेथील लोकांनी तिला रूग्णालयात नेले पण त्यापुर्वीच ती मरण पावली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काही जणांनी या प्रकरणाचे व्हीडिओ शुटिंग करून ते सोशल मिडीयावर व्हायरल केले आहे त्यामुळे खळबळ माजली आहे. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. पोलिसांनी त्या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)