..आठवले म्हणतात, ‘तोपर्यंत’  मोदी जिंकत राहतील

नवी दिल्ली : रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय केंद्रात सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी २०१९ च्या निवडणुकीबाबत महत्त्वाचे भाकीत केले आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करत काँग्रेसवर निशाणा साधला.

राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यात कधीच तुलना होऊ शकत नाही.  राहुल गांधी जोपर्यंत नेते आहेत, तोपर्यंत नरेंद्र मोदी जिंकत राहतील, असा टोला आठवलेंनी लगावला. दरम्यान, २०१९ लोकसभा निवडणुकीत भाजपला २०१४ पेक्षा कमी जागा मिळतील, असे भाकितही आठवले यांनी वर्तवले आहे.

रिपब्लिकन पक्ष २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही एनडीएचा भाग असेल. २०१९ मध्ये भाजपच्या जागा कमी होतील, मात्र केंद्रात भाजपच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार असेल, हे निश्चित असल्याचे आठवले म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

1 COMMENT

  1. वरील वृत्त वाचण्यात आले काँग्रेस काय पण इतर कोणत्याच पक्षाकडे श्री मोदींच्या तेलाचा उमेदवार नसल्यानेच प्रत्येक ठिकाणी बीजेपीची सरशी होत आली व होत आहे कारण बीजेपीच्या पाठीशी ज्या संघटना आहेत तशा काँग्रेस पक्षाच्या पाठीशी असलेल्या पाहावयास मिळतात का ? आजपर्यंत काँग्रेस गांधी आणि नेहरूंच्या नावाने जिकंत आला बीजेपी मद्धे हा मुख्य प्रकार पाहावयास मिळत नाही म्हणून जरी मोदी जिंकलेत तरी नेहमीसाठीच ते पंतप्रधानपद भूषवतील असे नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)