आठवणीतील ‘साहित्यिक’ कलबुर्गी

जेष्ठ पुरोगामी विचारवंत, संशोधक आणि माजी कुलगुरू डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची आजच्याच दिवशी ३० ऑगस्ट २०१५ रोजी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या घरात घुसून गोळय़ा झाडून हत्या केली होती .

एम एम कलबुर्गी यांचा जन्म कर्नाटक यारागल या गावी 28 नोव्हेंबर 1938 ला झाला. कन्नड़ विद्यापीठाचे कुलगुरू राहिलेले कलबुर्गी कन्नड़ साहित्याचे लेखक होते. कलबुर्गी धार्मिक कर्मकांड व मूर्ति पूजाविरुद्ध होते. देवभोळेपणा आणि अंधश्रद्धेवर कडाडून हल्ला चढवणारे कलबुर्गी अनेक वाद ओढवून घेत असल्याने त्यांना नेहमी टीकेला सामोरे जावे लागत होते.

साहित्य अकादमीसह अनेक मानाचे पुरस्कार
साहित्य विश्वात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे डॉ. कलबुर्गी यांचा राष्ट्रीय व राज्य पातळीवर अनेक पुरस्कारांनी सन्मान झाला होता. साहित्य अकादमीसह अनेक मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले होते. भारतातील अनेक भाषांमधून त्यांचे साहित्य अनुवादित झाले आहे.

मूर्तीपूजेला विरोध करणारे कलबुर्गी हे हिंदू धर्मातील अनेक रूढी-परंपरांची चिरफाड करणारे पुरोगामी व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. कलबुर्गी यांनी यातून विहिंप व बजरंग दलसारख्या हिंदुत्ववादी संघटनांचा रोष ओढवून घेतला होता. विद्रोही लेखक म्हणूनही त्यांची ओळख आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)