आठवणींच्या खिडकीतून दिसलेला : महाराष्ट्राचा वाल्मिकी

रात्रीच्या गारव्यातही गदिमांच्या आठवणीची उब इतकी होती की गदि माडगूळकर सभा मंडपातील एकही श्रोता तसूभरही हालला नाही. गदिमां यांनी पहिली जय मल्हार या चित्रपटासाठी लिहली आणि सव्वाशे चित्रपटांचे पटकथा लेखन केले. गदिमांच्या प्रतिभेला गेयपूर्ण शब्दांचा व्यासंग होता त्यांना तडजोड अजिबात मान्य नव्हता. शब्दडौल शोभला तो त्यांनाच अशी आठवण बाबूजीनी सांगितल्याची आठवण माडगूळकर यांनी सांगितली.

शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे नगरी

सातारा – डौलदार सांबराला त्याची शिंगे जशी शोभून दिसतात तोच डौल ग. दि. माडगूळकरांच्या काव्यप्रतिभेत होता. ती प्रतिभा त्यांनाच आयुष्यभर शोभली. त्यांची गीते म्हणजे सुंदर भावाविष्काराच्या कथा असतं अशा शब्दात गदिमांचे द्वितीय पुत्र व गदिमायन फेम आनंद माडगूळकर यांनी आपल्या वडिलांच्या आठवणी आठवणींच्या खिडकीतून गदिमा या सदरा अंर्तगत उलगडल्या. सोबत माडगूळकरानी गायलेल्या बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला या ठसकेबाज लावणीला रसिक सातारकरांनी टाळ्याच्या गजरात अक्षरश: डोक्‍यावर घेतले. ग्रंथमहोत्सवाचा पहिल्या दिवसाचा समारोप अत्यंत भावोत्कट वातावरणात गदिमांच्या आठवणींमध्ये झाला.

संपूर्ण महाराष्ट्राला गीतरामायणाची अलौकिक देणगी देणाऱ्या या सरस्वतीपुत्राने दिलखुलासं आयुष्य जगत माणसांबरोबर शब्दांशी मैत्री केली त्यातूनच महाराष्ट्राला आधुनिक युगाचा वाल्मिकी मिळाल्याची महत्वपूर्ण बाब माडगूळकर यांनी नमूद केली. ग्रंथ महोत्सवाचे कार्यवाह शिरीष चिटणीस यांनी आनंद माडगूळकर यांच्याशी दोन तास संवाद साधला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सांगली जिल्ह्यातील शेटफळं येथून सुरू झालेला गदिमांचा प्रवास वडिलांच्या सरकारी नोकरीमुळे विटा कुंडल व्हाया औंध असा झाला. बालपण खूप अडचणीत गेले आणि परिस्थितीमुळे त्यांना मॅट्रिक पास होता आले नाही असा गदिमांचा सुरवातीचा प्रवास सांगून माडगूळकर म्हणाले, गदिमा मी त्रिज आहे असे नेहमी म्हणत कारण जन्मत:च त्यांना मृत घोषित करण्यात आले. मात्र सुईणीने पोटाजवळ कोळशाचा निखारा धरल्यावर गदिमांनी ट्याहा चा सूर पकडला. सुईणीच्या निमित्ताने नियतीने गीतरामायणकार घडवला.

मास्टर विनायक यांच्या कंपनीच्या चित्रपटात किरकोळ काम ते करू लागले. तेथूनच त्यांचा मायानगरीचा प्रवास 1942 पासून सुरू झाला. पुणे-मुंबई येथील फेऱ्या पत्नी विद्या हिच्या सोबत झालेला प्रेमविवाह, कोल्हापूरच्या दैवज्ञ बोर्डिंगमध्ये गदिमांच्या लग्नात मित्रांनी रांग लावून भरलेले पाणी तेथीलच मिस्त्रीच्या बंगल्यात असतात मास्टर दीनानाथ मंगेशकर कुटुंबियांचा मिळालेला शेजार या सर्व आठवणी माडगूळकर यांनी हळुवारपणे उलगडताना त्यांचा जीवनपटच श्रोत्यांसमोर उभा केला.

संगीतकार सुधीर फडके उर्फ बाबूजी यांची व गदिमांच्या मैत्रीचा समन्वय अगदी हृदयापासून होता. दोघेही प्रतिभावंत एकमेकांना मनापासून ओळखत असल्याने या सरस्वती पुत्रांनी महाराष्ट्रात गीतरामायणाचा इतिहास घडवला. मात्र गीतरामायणाची गाणी लिहण्यापूर्वी 1952 साली गदिमा सज्जनगडावर गेले होते. तेव्हा गडावर वास्तव्यास असताना श्रीधरस्वामींनी आपल्या शिष्यांना मला भेटायला एक सरस्वती पुत्र येणार आहे असे सांगत गदिमांना आलिंगन दिले. सरस्वती आपल्याकडून अलौकिक कार्य घडवणार आहे असे सांगत त्यांच्या जिभेवर श्रीधरस्वामींनी ओंकार कोरला.

माडगूळला असताना त्यांच्या मळ्यात विहरीलगत गदिमा झोपलेले असताना त्यांना दिव्य अनुभुती झाली आणि त्यानंतर गीतरामायणातील पहिल्या गीताची निर्मिती झाली. गदिमांच्या अनेक गाणी आनंद माडगूळकर यांनी स्वतः गाऊन दाखवली. त्यात त्या त्यात बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला या बावनकशी लावणीला श्रोत्यांनी टाळयांच्या गजरात मनापासून दाद दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)