आठच महिन्यात विजेचे पोल खचले….!

निकृष्ट काम करूनही मर्जीतील ठेकेदाराला लाखोंचे बिल अदा

भुईंज – ओझर्डे ते वाई रस्त्याच्या दुतर्फा उभे केलेले विजेचे पोल पोल खचून आडवे होवू लागले आहेत. ते कुठल्याही क्षणी ढासळून जीवित हानी होण्याची शक्‍यता असल्याने शेतकरी जीव मुठीत येथून ये-जा करत आहेत. संबंधित ठेकेदाराने घाईगडबडीत विजेचे पोल उभे केले तरी या अधिकाऱ्यांच्या मर्जीतील ठेकेदाराचे लाखो रुपयांचे बिल अदा करण्यात आले आहे.

याबाबत अनेक तक्रारी करूनही त्यास केराची टोपली दाखवून ठेकेदारास पाठीशी घातले जात आहे. वाईच्या कार्यकारी अभियंता कार्यालया मार्फत गेल्या आठ महिन्यांपुर्वी वाई ते ओझर्डे अशा 10 किमी अंतरापर्यंत वीज पुरवठा करण्यासाठी नवीन पोल उभे करण्यासाठी मर्जीतल्या ठेकेदाराची निवड करुन त्यास ठेका देण्यात आला होता. पण त्या नेमलेल्या ठेकेदाराने नवख्या कामगारांमार्फत खड्डे काढून घाई गडबडीत पोल उभे करून स्वत:चे कामाचे पैसे काढून घेतले. वास्तविक काम सुरु झाल्यावर जबाबदार अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली हे काम करणे आवश्‍यक होते.

कामात सर्व कामकाज “ओके’ असल्याचा बोगस अहवाल तयार करण्यात आला आणि त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कसलीही पाहणी न करताच मर्जीतील ठेकेदाराचे लाखो रुपयांचे बील काढून देण्यात आले. आठ महिन्यांपुर्वी पोल उभे करुन दिल्यानंतर काही दिवसातच त्यावर वीजतारा ओढण्यात आल्या. परंतु, 15 दिवसातच पावसामुळे 10 ते 12 पोलची लाईन आडवी झाली. त्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी वाईच्या कार्यालयाकडे केल्या. पण अधिकाऱ्यांच्या मर्जीतील ठेकेदार असल्याने त्याच्यावर निकृष्ठ कामाचा ठपका ठेवण्याचे कुणी दाखवले नाही. आठ महिन्यातच हे उभे पोल आता जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहेत. पोल अचानक कोसळल्यास शॉक बसून एखाद्याने जीव गमावण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे तातडीने संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)