आझाद मैदानावरील मराठा आंदोलकांचे उपोषण मागे

संग्रहित छायाचित्र

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत जल्लोष

मुंबई – मराठा आरक्षणाचे विधेयक विधानसभेमध्ये एकमताने मंजूर झाल्यावर आझाद मैदानावर मराठा क्रांती मोर्च्याकडून सुरू असलेले बेमुदत उपोषण मागे घेण्यात आले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आंदोलकांनी उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली. मराठा आरक्षणासह 19 मागण्यासाठी आझाद मैदानावर मराठा क्रांती मोर्च्याचे
कार्यकर्ते उपोषण करत होते. मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण जाहीर झाल्यामुळे सगळीकडे जल्लोष केला जात आहे. आझाद मैदानावर मराठा क्रांती मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी याचा आनंद केला पण आंदोलक आंदोलनावर ठाम होते. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आझाद मैदानावर जाऊन आंदोलकांची भेट घेतली.

-Ads-

उद्धव ठाकरे यांनी आंदोलकांना आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेत असल्याची जाहीर केले. मराठा मोर्चातील धरपकड झालेल्या कार्यकर्त्यांना तात्काळ सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी आजच बोलणार असल्याचे आश्वासन उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले. तसेच इतर ज्या मागण्या आहेत त्यावरही चर्चा करणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि इतर पदाधिकारी सोबत होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)