आझाद मित्र मंडळाचा “वखारीचा राजा’ मुख्य आकर्षण.

भोर- भोर शहरातील आझाद मित्र मंडळ, अखिल बजरंग आळी या 52 वर्षांची परंपरा असलेल्या आझाद मित्र मंडळाचे अध्यक्ष, माजी उपनगराध्य गणेश पवार यांनी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या सहकार्याने गेल्या 15-20 वर्षांपासून गणेशोत्सव काळात अनेकविध देखावे सादर करून समाजातील होतकरू आणि गरजु विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला असल्याचे मंडळाचे पदाधिकारी प्रशांत जाधव आणि मयुर शिळीमकर यांनी सांगितले. गणेशोत्सव काळात गेल्या अनेक वर्षांपासून या मंडळाचा “वखारीचा राजा’ ही 15 फुट उंचीची गणेश मूर्ती आणि नेत्रदीपक सजावट ही भोर शहरासह तालुक्‍यातील गणेश भक्तांचे मुख्य आकर्षणा ठरत असून, हा देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.
गणेशोत्सव काळात अथर्वशीर्ष पठण, चित्रकला स्पर्धा, डान्स आणि फॅशन शो, चिमुकल्यांसाठी फनी गेम्स, महिलांसाठी होम मिनिस्टरसारख्या कार्यक्रमांचे आयोजन उत्सव काळात नऊ दिवस केले जाते. समाजातील गरीब होतकरू मुलांच्या मदतीसाठी मंडळ विशेष योजना राबवते. मिळालेली सर्व रक्कम या मुलांचे शिक्षणासाठी मदत रूपाने दिली जाते, अशी माहीती मंडळाचे अध्यक्ष गणेश पवार यांनी दिली. मंडळाची स्थापना 1965 मध्ये तत्कालिन भोरकर आप्पा, काका कोंढाळकर, बोंडगे आदींनी 12 रुपये वर्गणीवर केली असून, गेल्या 52 वर्षांच्या काळात या गणेश मंडळाने गरुड भरारी घेतली आले. या मंडळाचे वैशिष्ट्य असे की, स्थापनेपासून ते विसर्जन मिरवणुकीपर्यंत संपूर्ण उत्सव डीजेविरहीत केला जातो. यावर्षी मंडळाने गणेश भक्तांना दहा दिवस “वाय-फाय’ सेवा मोफत दिली असल्याचे गणेश पवार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)