आज होणार धनगर समाजाचे आंदोलन

पुणे – धनगर समाजाचला अनुसूचित जमातीचे दाखले देऊन सवलतीची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. आज (दि. 10) सकाळी अकरा वाजल्यापासून या आंदोलनाला सुरवात होणार असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते यांनी दिली.

मराठा क्रांती मोर्चानंतर आता धनगर समाजाने आरक्षणासाठी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये धनगर समाजाचा एस.टी. प्रवर्गात समावेश करावा, सोलापूर विद्यापीठाला राजमाता पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे, धनगर आरक्षणासाठी आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावे, समांतर आरक्षणाचे शासनाने काढलेल्या परिपत्रकात सुधारणा करावी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गामधून एमपीएसच्या परिक्षा देण्यासाठी पूर्वीच्याच सवलती कायम ठेवाव्यात यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य धनगर आरक्षण कृती समितीनी दिली.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)