आज वडार समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा

नगर – टेंभुर्णी येथील वडार समाजातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. या पीडितेला न्याय तसेच या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी वडार संघर्ष समितीच्या वतीने शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे उद्या सकाळी 11 वाजता मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी राकेश विटकर, मुकुंद पोवार, रमेश जरे, संपत गायकवाड, संदीप कुसळकर, शिवाजी नन्नवरे, उमेश कुसमुडे, सागर कुसमुडे, श्रीकांत मंजुळे आदी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे.

टेंभुर्णी ता. अहमदपूर, जि. लातूर येथील वडार समाजातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून 30 डिसेंबर 2017 रोजी खून करण्यात आला होता. प्रकरण होऊन 1 महिना होत आहे तरी आरोपी मोकाट आहे. या प्रकरणातील पीडितेला न्याय मिळावा, यासाठी उद्या शिवाजी महाराज पुतळा, माळीवाडा बसस्थानक, आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा राष्ट्रीय वडार समाजाचे राष्ट्रीय महासचिव यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)