आज मला अभिमान वाटतो – करण जोहर

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश दिपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने समलैंगिक संबंध अपराध नसल्याचा ऐतिहासिक निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने कलम 377 मधील तरतूद रद्‌द करत दोघांची संमती असल्यास तो अपराध नसल्याचे सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाचे सर्व समाज स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. तसेच बॉलीवुडमधूनही या निर्णयावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यात बॉलीवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर याचाही समावेश आहे. त्याने ट्‌वीटवर आनंद व्यक्‍त करत लिहिले की, ऐतिहासिक निकाल!! आज खूप अभिमान वाटतोय! समलैंगिकतेला गुन्हेगारीच्या कक्षेबाहेर करणे आणि कलम 377 रद्द करणे ही मानवता आणि समान हक्कांसाठी मोठी बाब आहे. देशाने पुन्हा ऑक्‍सिजन मिळवला, असे ट्‌विट केले आहे.

हा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, प्रत्येकाला आपल्या मर्जीने जगण्याचा अधिकार आहे. जुनी विचारधारा बदलण्याची गरज, प्रत्येकाला स्वत:ची स्वतंत्र ओळख आहे. त्यामुळे समलिंगी संबंध हा गुन्हा नाही, असे सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने एकमताने निर्णय दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)