आज नरकचतुर्दशी, पावणेसातपर्यंत अभ्यंगस्नान मुहूर्त

पुणे – असंख्य दिव्यांनी उजळलेले संपूर्ण शहर, आकाशात दिसणारे रंगेबेरंगी फटाके आणि आकाशदिवे, घरांतून येणारा फराळाचा वास आणि पहाटे पडणारी गुलाबी थंडी हे संपूर्ण वातावरण दिवाळीत सर्वत्र अनुभवायला मिळते. निमित्त असते, नरक चतुर्दशीचे.

दिवाळीतील तिसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशीचा. कार्तिक कृष्ण पक्ष चतुदर्शीला नरक चतुर्दशी साजरी केली जाते. या दिवशी पहाटे उटणे लावून अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आहे. नरकचतुर्दशीच्या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला. नरकासुराचे प्रतीक म्हणून कारीटं चिरडण्याची पद्धत आहे. यादिवशी लोक घरांची साफसफाई करतात. शारीरिक स्वच्छतेला विशेष महत्त्व आहे. सूर्यादयापूर्वी उठून तेल-उटणे लावून स्नान केले पाहिजे. या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून जे लोक स्नान करत नाहीत, वर्षभर त्यांच्या मागे दारिद्रय आणि संकट पाठ सोडत नाही, असे मानले जाते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अभ्यंगस्नान मुहूर्त: पहाटे 05:08 ते 06:44.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)