आज ‘क्लासिको’ थरार,  हे दोन खेळाडू दहा वर्षात प्रथमच नाही खेळणार

आज ला लीगामध्ये गतविजेत्या आणि सध्या पहिल्या स्थानावर असलेले बार्सेलोना तर सलग तीन वेळा चॅम्पियन्स चषक जिंकणारे रियाल माद्रीद यांच्यात आज संध्याकाळी ८: ४५ मिनिटांनी बार्सेलोनाच्या घरच्या मैदानावर सामना होणार आहे.  या दोन संघातील सामना हा पृथ्वीतलावर सर्वात जास्त पहिला जाणारा फुटबॉलचा सामना म्हणून ओळखला जातो. या दोन संघातील लढत ‘एल क्लासिको’ म्हणून ओळखली जाते. 

घरच्या मैदानावर सामना होत असल्याने या सामन्यात बार्सेलोनाचा संघ विजयाचा दावेदार मानला जात आहे.  मागील दोन्ही सामन्यात त्यांनी प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व गाजवले आहे. मागील सामन्यात स्टार खेळाडू लियोनेल मेस्सीच्या अनुपस्थितीत त्यांनी इंटर मिलानवर २-० असा विजय मिळवला होता. लुईस सुवारेज, फिलीप कोटिन्हो, राफिन्हा, जोर्डी अल्बा आणि इव्हान रिकिटीक हे सध्या चांगले फॉर्मात असून त्यांच्याकडून या सामन्यात चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. तर ऑर्थर मेलो, विडाल आणि डेम्बेले हे देखील संघात दिसू शकतात. 
 
माद्रिद संघ हा मागील काही सामान्यांपासून आपली लय गमावून बसले आहेत. मागील पाच पैकी चार सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. आघाडीवर इस्को जायबंदी असल्याने ते थोडे जास्त पेचात अडकले आहेत. गॅरेथ बेल, करीम बेंजिमा हे  गोल करण्यात थोडे कमी पडत आहेत. या संघाचे मध्यरक्षक लुका मॉड्रीच  आणि टोनी क्रूस यांच्याकडून देखील या सामन्यात चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

 
मागील दहावर्षात प्रथमच घडतेय असे –
सार्वकालीन महान फुटबॉलपटू बार्सेलोनाचा कर्णधार लियोनेल मेस्सी आणि पोर्तुगालचा स्टार आणि माद्रिदचा माजी महान फ़ुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो यांच्या अनुउपस्थितीत हा सामना खेळला जाणारा आहे. मागील दहा वर्षात हि पहिलीच वेळ असेल जेव्हा  या दोन खेळाडूंपैकी एकही खेळाडू या सामन्यात खेळत नसेल. मागील आठवड्यात सिव्हिला संघासोबत झालेल्या सामन्यात दुखापतग्रस्त झाल्याने लियोनेल मेस्सी उबलब्ध नाही तर रोनाल्डोने या मोसमाच्या सुरुवातीला जुवेंटस संघाशी करार केला असल्याने तो आता जुवेंटससाठी खेळतो.
 

 

 

 
 
 

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)