आज, उद्या रेल्वेचा मेगाब्लॉक

पुणे- पुणे रेल्वे स्टेशन वरील प्लॅटफॉर्म क्रमांक तीन व चार वर दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे येत्या शनिवार व रविवारी सकाळी 8.30 वाजल्यापासून दुपारी 2.30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक राहणार आहे.या ब्लॉकमुळे काही लोकल गाड्या तसेच रेल्वे गाड्या प्रभावित होणार असून त्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या पुढील प्रमाणे त्यात सकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी सुटणारी पुणे-लोणावळा लोकल,त्याचबरोबर सात वाजून 25 मिनिटांनी लोणावळा येथून सुटणारी लोकल, सकाळी दहा वाजून 32 मिनिटांनी सुटणारी पुणे-दौड डेमू, सकाळी 11 वाजून पंधरा मिनिटांनी सुटणारी पुणे-कर्जत पॅसेंजर,बारा वाजून 15 मिनिटांनी सुटणारी पुणे लोणावळा लोकल, दुपारी बारा वाजून 10 मिनिटांनी सुटणारी बारामती-पुणे-पॅसेजर ही दौड पर्यत धावणार आहे.पुणे-निजामाबाद पॅसेजर ही पुण्याहून दोन वाजून 25 मिनिटांनी प्रस्थान करेल आणि दौड ला रद्द होईल.दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांनी लोणावळा ते पुणे ही रद्द करण्यात आली आहे.

सातारा-पुणे पॅसेंजर ही घोरपडी स्टेशन पर्यत येणार आहे,त्याचबरोबर पुणे-कोल्हापर-पुणे पॅसेजर घोरपडीला थांबणार आहे. लोणावळा ते पुणे लोकल आणि पुणे ते लोणावळा लोकल शिवाजीनगर पर्यंत धावणार आहे.त्याचबरोबर सोलापूर ते पुणे एक्‍सप्रेस गाडी दौडच्या पुढे पंधरा मिनिट थांबविण्यात येणार आहे. कोईमबतूर एलटीटी एक्‍सप्रेस दौड ते पुणे दरम्यना 25 मिनिटे थांबविण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)