आज आलोक वर्मा यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार

सीबीआयमध्ये चालू असलेलया अंतर्गत गोंधळाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. आज शुक्रवारी सीबीआय डायरेक्टर आलोक वर्मा यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सीबीआई डायरेक्टर आलोक वर्मा आणि स्पेशल डायरेक्टर राकेश अस्थाना यांच्यामधील आरोप – प्रत्यारोप हे सार्वजनीक झाल्यानंतर त्या दोन्ही अधिकाऱ्यांना केंद्रा सरकारने सक्तीच्या सुट्टीवर पाठविले होते. केंद्रीय अन्वेषण ब्यूरोचे डायरेक्टर आलोक वर्मा यांचे अधिकार वापस घेऊन त्यांना सुट्टीवर पाठवण्याच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

आलोक वर्मा यांनी या याचिकेत, त्यांना सुट्टीवर पाठविणे आणि १९८६ च्या बॅचचे भारतीय पुलिस दलात ओडिशा कैडरचे अधिकारी तथा एजेंसीचे संयुक्त डायरेक्टर एम नागेश्वर राव यांच्याकडे सोपवण्यात आलेले सीबीआयचे  अंतरिम प्रभारी पद या निर्णयावर रोक लावण्यासाठीही याचिका दाखल केली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सर्वोच्च न्ययालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ति रंजन गोगोई, न्यायमूर्ति एस के कौल आणि  न्यायमूर्ति के.एम.जोसेफ यांचे खंडपीठ वर्मा  यांच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे. आलोक वर्मा यांच्या याचिकेवर होणारी सुनावणी ही खूप  हाय होल्टेज होण्याचा अंदाज आहे. कारण, दोन्ही बाजूंचे पक्ष हे दिग्गज मंडळी सांभाळत आहेत.

आलोक वर्मा यांच्यासाठी वरिष्ठ वकील आणि प्रख्यात कायदेतज्ञ् फली एस नरीमन तर केंद्राच्यावतीने के के वेणुगोपाल आपली बाजू मांडतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)