आजोबाचा नातीवर बलात्कार

जन्मलेल्या बाळाला टाकले मारुन:बागेवाडीची घटना
फलटण, दि. 14 (प्रतिनिधी) – फलटण तालुक्‍यातील बागेवाडी बरड, ता. फलटण येथे एका आजोबाने तिच्या नातीवर बलात्कार केल्याची घटना घडली असून या घटनेनंतर ती गरोदर झाली यानंतर तिने एका बाळाला जन्म देऊन त्याला मारुन टाकल्याची अत्यंत खळबळजनक घटना घडली असुन याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अजोबा विरोधात बलात्कार व पोक्‍सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर अल्पवयीन मुलीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत फलटण ग्रामीण पोलीसांनी दिलेल्या माहिती अशी की , शामराव बाजीराव जाधव रा.बागेवाडी बरड, ता. फलटण यांनी खुरंगे मळ्यात जानेवारी 2018 ते मार्च 2018 या कालावधीत अल्पवयीन नातीवर बलात्कार केला. त्यावेळी याबाबत कोणासही सांगितले तर तुला जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली धमकीच्या भितीने सदर प्रकार कोणासही सांगितला नाही. त्यानंतर आजोबा शामराव बाजीराव जाधव यांनी वेळोवेळी चारवेळा खुरंगे मळ्यात गवत आणण्यासाठी नेउन बलात्कार केला. त्यामुळे संशयित आरोपीपासून मुलगी नऊ महिन्याची गरोदर राहिली व तिने दि 11 नोव्हेंबर 2018 रोजी एका मुलास जन्म दिला व सदर मुल तीला नको होते लोकांना कळाले तर तीची व अजोबांची बदमानी होईल म्हणुन तिने बालकांचा गळा दाबुन खुन केला व तेथे असलेले ब्लेड पानने मुलाच्या गळ्यावर वार केला व बागेवाडी बरड ता.फलटण जमीन गट नं 240 मधील ऊसाचे शेतात सदर बाळ विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने टाकले असुन या प्रकरणी सुर्यदास विठोबा निगडे रा.बागेवाडी बरड यांनी अल्पवयीन मुली विरोधात फिर्याद दिली असुन भा.द.वि 318,302 अन्वये अल्पवयीन मुलीवर गून्हा दाखल झाला आहे.तपास स.पो.नि.बोंबले करीत आहेत. तर आजोबा शामराव बाजीराव जाधव यांच्या विरोधात बालकाचे लैंगिक अपराध पासून संरक्षण अधिनियम 2012 क्र 4,6 व भा.द.वि कलम 376(2)(एफ), 376(2)(एन),376, 502 नुसार गुन्हा दाखल झाला असून याचा अधिक तपास सहा. पो.उपनिरीक्षक भोळ करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
10 :cry: Sad
6 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)