आजी-माजी सैनिकांची घरपट्टी माफ

भोर- देशाचे संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या माजी सैनिक आणि मृत सैनिकांच्या विधवा पत्नी, शहिद जवानांच्या वीर पत्नी तसेच शौर्यपदक प्राप्त माजी सैनिकांना संपूर्ण घरपट्टी माफ करण्यात आली आहे, अशी घोषणा भोरचे तहसीलदार अजित पाटील आणि भोर तालुका पंचाया समितीचे गटविकास अधिकारी संतोष हराळे यांनी केली.
भोर तालुक्‍यातील आजी-माजी सैनिकांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी घेण्यात आलेल्या सभेत तहसीलदार पाटील व गटविकास अधिकारी हराळे यांनी ही घोषणा केली. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगारे, माजी सैनिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब समगीर, विजय बर्के, के. एल. टापरे यांच्यासह तालुक्‍यातील माजी सैनिक, माजी सैनिकांच्या वीर पत्नी, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, शहिद जवानांच्या वीर पत्नी तसेच शासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी अजित पाटील व संतोष हराळे यांनी सांगितले की, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत या सर्वांना घरकुल योजनेचा लाभ दिला जाईल. तसेच माजी सैनिकांसह त्यांच्या वीर पत्नी, विधवा पत्नी, तसेच शहिद जवानांच्या वारसांना तत्काळ शिधापत्रिका देऊन माजी सैनिकांचे सारे प्रश्‍न सोडवण्यासाठी प्राधान्यक्रम दिला जाईल, असे त्यांनी नमूद केले. तर मेजर मिलिंद तुंगार यांनी माजी सैनिकांसाठी असणाऱ्या शासकीय योजनांची यावेळी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सैनिक विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब समगीर, सूत्रसंचालन प्रकाश भामे, तर संघटनेचे सचिव के. एल. टापरे यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)