आजी-माजी पालकमंत्र्यांची टोलेबाजी

पुणे – जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री गिरीश बापट आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शाब्दिक टोलेबाजी रंगली. तिर्थक्षेत्रांसाठी निधीच्या मुद्यावरून अजित पवार बापटांना म्हणाले, पालकमंत्र्यांनी कठोर रहावे, असा सल्ला दिला होता. तर त्यांना उत्तर देताना बापट यांनी “दादा आता तुमचा आदर्श घेतो आणि कठोर राहतो’, असे प्रत्युत्तर दिले. दोन आजी-माजी पालकमंत्र्यांच्या टोलेबाजीमुळे उपस्थित खासदार, आमदार आणि सरकारी अधिकाऱ्यांनाही हसू आवरता आले नाही.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये देवस्थानांना तिर्थक्षेत्राचा दर्जा देणे आणि निधी देण्यावरून चर्चा सुरू होती. त्यावेळी पवार म्हणाले, देवस्थान किती मोठे आहे, तेथे वर्षाला किती भाविक येतात, अशा सर्व गोष्टींचा विचार व्हायला हवा. जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची समिती नेमण्यात येत होती. या समितीच्या अहवालावरूनच तीर्थक्षेत्रांना निधी देण्यात येत होता. कोणी मागणी केली म्हणून एखाद्या देवस्थानला तिर्थक्षेत्र म्हणून घोषीत करायला नको. यावर बापट म्हणाले, तिर्थक्षेत्र घोषीत करण्यासाठी नियमावली ठरविली आहे. या नियमावलीच्या आधारेच एखाद्या देवस्थानला तिर्थक्षेत्राचा दर्जा द्यायचा की नाही, हे ठरविले जाते. मात्र, अनेकदा देवस्थानला तिर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा, यासाठी लोकप्रतिनिधी आग्रह धरतात. त्यामुळे काही वेळेस नियम पाळले जात नाहीत.

बापटांनी सांगितलेले कारण ऐकताच पवार म्हणाले, पालकमंत्र्यांनी कठोर रहावे. यावर क्षणाचाही विलंब न लावता, बापट म्हणाले, “दादा आता तुमचा आदर्श घेतो आणि कठोर राहतो’. यावर दोन्ही नेते हसू लागले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)