आजी-माजी नगरसेवकांविरोधात तक्रार

पुणे – बांधकाम व्यावसायिकाला धमकी देऊन खंडणी मागितल्या प्रकरणी पुणे महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष अनिस सुंडके, विद्यमान नगरसेवक गफूर पठाण आणि माजी नगरसेवक रईस सुंडके यांच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. या तिघांनी बांधकाम व्यावसायिकाला केलेली दमदाटी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

बांधकाम व्यावसायिक सादिक काझी यांनी याबाबत पोलीस आयुक्तांकडे तसेच कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. माझ्या सोसायटीत येऊन “कामाच्या बदल्यात आम्हाला पैसे दे अन्यथा तुला उडवून टाकू’ अशी धमकी या तिघांनी दिली असल्याचे काझी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच हे सर्वजण कोंढवा परिसरात बांधकाम व्यावसायिकांकडून खंडणी मागतात असा आरोपही या तक्रारीत करण्यात आला आहे. काझी यांनी केलेल्या आरोपाबाबत नगरसेवक गफुर पठाण यांच्याशी संपर्क साधला असता बांधकाम व्यावसायिकाने खोटी तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्याने दिलेल्या खोट्या तक्रारी विरोधात आम्ही पोलिसात तक्रार दिली असल्याचेही पठाण यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)