आजी-माजी नगरसेवकांची पार्किंगसाठी “दादागिरी’

जळोची- शहरात पार्किंगची समस्या, वाहतूककोंडी, पार्किंगवरून होणारे वाद या गोष्टी नागरिकांसाठी आता सवयीच्या झाल्या आहेत. मात्र, बारामती नगरपालिकेच्या नवीन इमारतीत पदाधिकाऱ्यांना पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे. आजी-माजी नगरसेवक “दादा’गिरी करून नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांच्या पार्किंगच्या जागेवरच स्वतःचे वाहन पार्क करीत असल्याने पदसिद्ध पदाधिकाऱ्यांना स्वतःच्या गाड्या अंतर्गत रस्त्यावर अथवा इतरत्र पार्क कराव्या लागत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण देण्यासाठी ज्या बारामतीतून खास प्रयत्न झाले, त्याच पवारांच्या बारामतीत महिला नगराध्यक्षांच्या वाहनाच्या जागेवर अनेक आजी-माजी नगरसेवक दंडेलशाही करून स्वतःचे वाहन आरक्षित जागेवर पार्क करून अनेक दिवस बाहेर गावी निघून जातात. मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्या वाहनासाठी आरक्षित वाहन पार्किंग भागात घुसखोरी केल्याने अनेकवेळा पदाधिकाऱ्यांना अरेरावीला सामोरे जावे लागते. सुरक्षारक्षकाला हे पदाधिकारी वेळप्रसंगी शिवीगाळ करतात. अशा मुजोर नगरसेवकांना कोण रोखणार असल्याचा प्रश्‍न प्रशासनाला पडला आहे. मात्र, याबाबत एकही व्यक्‍ती याबाबत बोलण्यास तयार नाही.

  • जे आजी-माजी नगरसेवका महिला नगराध्यक्षांना त्याचे वाहन पार्किंग करून देत नाही. त्यांना कामकाज काय करून देत असतील. अशा मुजोर नगरसेवकांवर कोण कारवाई करणार.
    – जितेंद्र तावरे, नागरिक
  • नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष यांच्यासाठी वाहन पार्किंग संबंधीची समस्या आहे. सुरक्षारक्षकांना योग्य त्या सूचना देऊन समस्येचे निरसन केले जाईल.
    – योगेश कडूसकर, मुख्याधिकारी बारामती नगरपालिका,

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)