आजारी हरीण वनखात्याच्या ताब्यात

नायगाव- पुरंदर तालुक्‍यातील नायगाव येथील चौंडकरवाडीजवळ एका शेतात आजारी असलेले हरीण आढळून आले आहे. ग्रामस्थांनी हरणाला वन विभागाच्या ताब्यात दिले आहे. प्राथमिक उपचारानंतर हरणाला कात्रज (पुणे) येथील प्राणी संग्रहालयात सोडण्यात आले.
गावचे शेतकरी त्रिंबक चौंडकर शेतात काम करीत होते. त्यावेळी त्यांना आजारी अवस्थेतील एक हरीण आढळून आले. त्यानंतर त्यांनी नायगावचे ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत चौंडकर यांना फोन वरून संपर्क साधला. चौंडकर यांनी वनखात्याचे कर्मचारी ज्ञानेश्वर खेडेकर यांच्याशी संपर्क केला. तोपर्यंत गावातील पशुसंवर्धन डॉक्‍टर कारंडे यांनी हरणावर प्राथमिक उपचार केले. यावेळी बाळासाहेब कड, आण्णा चौंडक, संतोष गायकवाड, माणिक खेसे आदी उपस्थित होते.
हरणाला वन विभागाचे कर्मचारी ज्ञानेश्वर खेडेकर व वनरक्षक गणेश पवार यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. यावेळी खेडेकर यांनी सांगितले की, वन्यजीव हाताळणे, प्रदर्शन करणे व त्यांना दुखापत करणे कायद्याने गुन्हा आहे. विनापरवाना वन्यजीव बाळगल्यास कडक कारवाईची तरतुद आहे. त्यामुळे कोणीही कायद्याचा भंग करू नये.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)