आजारी जेट एअरवेजबरोबर टाटा समूहाची बोलणी सुरू 

मुंबई – तोटा आणि खेळत्या भांडवलाची नितांत गरज असलेल्या जेट एअरवेजमधील शेअर विकत घेण्यासाठी टाटा समूहाने बोलणी सुरू केली असल्याचे वृत्त आहे. काही वृत्त माध्यामांनी दिलेल्या माहितीनुसार या बोलणीत जेट एअरवेजचे प्रमुख नरेश गोयल स्वत: भाग घेत आहेत. या अगोदरही ही बोलणी सुरू होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात होती. मात्र काही मुद्द्यावरून ही चर्चा पुढे जाऊ शकली नव्हती. आता पुन्हा नव्याने ही बोलणी सुरू झाली असल्याचे वृत्त आहे.

टाटा समूहाला जेट एअरवेजवर पूर्ण नियंत्रण हवे असल्याचे बोलले जात आहे. मात्र गोयल काही भागभांडवल स्वत:कडे ठेवण्याचा उत्सुक असल्याचे बोलले जात होते.आता या मुद्यावर या कंपन्यांनी काही तरी तोडगा काढला असल्याची शक्‍यता आहे. ही मूल्यांकनाची बोलणी काही आठवडे चालण्याची शक्‍यता आहे.

-Ads-

जेट एअरवेजपुढे खेळत्या भांडवलाचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. गेल्या काही महिन्यात इंधनाचे दर वाढले हो. मात्र त्या प्रमाणात महसूल कंपन्याना निर्माण करता आला नव्हता. त्यामुळे दुसऱ्या तिमाहीत जेट एअरवेजला तोटा झाला आहे. गेल्या तीन तिमाहीपासून कंपनीला तोटा होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)