आजारांविषयी प्रभावीपणे जनजागृती गरजेची

उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिक्षका डॉ. सीमा देशमुख

मंचर- भविष्यात उद्‌भवणाऱ्या आजारांना आळा घालण्यासाठी तरुण शक्तीने जनजागृती केली पाहिजे. आरोग्य विभाग आजारांविषयी जनजागृती करते.तरीही प्रभावीपणे जनजागृती होण्यासाठी सेवाभावी संस्थासह तरुणांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे मत उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिक्षका डॉ. सीमा देशमुख यांनी व्यक्त केले.
मंचर उपजिल्हा रुग्णालय व महात्मा गांधी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मंचर शहरातून जागतिक एड्‌स दिनानिमित्त रॅली काढण्यात आली. महात्मा गांधी विद्यालयापासून या रॅलीचे आयोजन करण्यात आले. संभाजी चौक ते बाजारपेठ मार्गे शिवाजी चौकातून उपजिल्हा रुग्णालय येथे रॅलीचा समारोप झाला. उपजिल्हा रुग्णालय येथे मुला-मुलींना एचआयव्ही एड्‌स या आजाराबाबत समुपदेशक सुहास मानेकर यांनी मार्गदर्शन केले.
समाजात वाढणारा गैरसमज आणि आपण त्यापासून कसे वाचू शकतो हे उदाहरणांद्वारे मानेकर यांनी सविस्तर सांगितले. रॅलीमध्ये मुलांनी नाही लस नाही उपचार प्रतिबंध हाच आधार, एड्‌सला नकार द्या जीवनाला होकार द्या, तारुण्यांचे वळण आहे मोक्‍याचे पण एड्‌सच्या धोक्‍याचे आदी घोषणा देण्यात आल्या. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य उत्तम आवारी, एल. व्ही. रोडे, एस. एस. बाणखेले, आर. बी. मुळुक, एस. एस. पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. महेश गुडे, औषध निर्माण अधिकारी संजय सोमवंशी पाटील व राहुल खेमणार उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)