आजपासून स्थूलता विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद

पुणे – लॅप्रो ओबोसे सेंटरतर्फे आयोजित केलेली देशातील पहिली ब्रेस्ट मेटासर्ज 2018 ही स्थूलता या विकारावरील आंतरराष्ट्रीय परिषद येत्या शुक्रवारपासून सुरू होत आहे. या परिषदेचे उद्‌घाटन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर आदी यावेळी उपस्थित रहाणार आहेत. ही परिषद सेनापती बापट रस्त्यावरील जे. ब्लू. मॅरिएट येथे होणार असून 16 जूनपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती एलओसीचे प्रमुख डॉ. शशांक शहा यांनी दिली.

स्थूलता आणि चयापयाच्या संबंधित शस्त्रक्रियेच्या क्षेत्रात बॅरियाट्रीक एन्डोस्कोपी सर्जरी ट्रेंड्‌स ही आंतराष्ट्रीय पातळीवरील परिषद आहे. आतापर्यंत ही परिषद न्यूयॉर्क व लेसबर्न या ठिकाणी झाली असून पुण्यात पहिल्यांदाच अशा प्रकारची परिषद होत आहे. याबाबत माहिती देताना डॉ. शहा म्हणाले, भारतीयांच्या दृष्टीने स्थूलता हा मोठा विकार म्हणून पुढे येत आहे. त्यातून नागरिकांमधील वाढता स्थूलतेला प्रतिबंध करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी परिषदेत ओबेसीटी प्रिव्हेंशन अँन्ड कंट्रोल टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार आहे. याचेही उद्‌घाटन जावडेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)