आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन

नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (सोमवार) सुरु होणार आहे. गुरुवारी 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील. अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्त रविवारी केंद्र सरकारच्यावतीने सर्वपक्षीय बैठकही बोलवण्यात आली होती.

या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने होणार आहे. राष्ट्रपतींच्या या अभिभाषणातून मोदी सरकार आपल्या मागील चार वर्षाचा लेखाजोखा मांडू शकतं. तसेच पुढील एक वर्ष सरकारचा काय अजेंडा असेल याचा देखील आढावा घेतला जाऊ शकतो.

राष्ट्रपतींचं अभिभाषण सकाळी 11 वाजता संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सुरु होईल. आज सरकार आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करेल आणि 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाईल. या अर्थसंकल्पीय अधिवेशनचा पहिला टप्पा 29 जानेवारी ते 9 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)