आजपासून दोन दिवस बँका बंद

पुणे : वेतनवाढीच्या प्रस्तावाविरोधात देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी आजपासून दोन दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस बँकांच्या शाखांमधील व्यवहार ठप्प होणार आहेत. परिणामी खातेदारांना ऑनलाइन व्यवहार व एटीएमवरच अवलंबून राहावे लागणार आहे.

राष्ट्रीयीकृत बँकांची अवस्था सध्या गंभीर असून या पार्श्वभूमीवर बँकांना बँक कर्मचाऱ्यांना अधिक वाढीव वेतन देणे शक्य नाही, असे सांगत ‘आयबीए’ने केवळ दोन टक्के वेतनवाढीचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळेच बँक कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. इतकेच नव्हे; तर लवकरात लवकर सुधारित वेतन प्रस्ताव न दिल्यास मे महिन्याच्या अखेरीस दोन दिवस संप पुकारण्याचा इशाराही बँक कर्मचाऱ्यांनी दिला होता. आयबीए व अन्य यंत्रणांनी हा संप टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, समाधानकारक तोडगा न निघाल्याने आता बँक कर्मचारी दोन दिवसांच्या संपावर जाणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)