आजपासून तीन दिवस शहीद भगतसिंग व्याख्यान माला

चिंचवड – आयुष्यभर रक्‍तदान, मरणोत्तर नेत्रदान ब्रीद घेऊन नेत्र सेवा प्रतिष्ठानने तीन दिवस शहीद भगतसिंग व्याख्यान माला आयोजित केली आहे. बुधवार दि. 21 ते शुक्रवार दि. 23 मार्चला काकडे पार्क, पोदार शाळेजवळ, चिंचवड येथे दररोज सायंकाळी ठीक साडेसहा वाजता व्याख्यान माला होईल. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे व्याख्यान मालेस प्रमुख उपस्थिती राहतील.

बुधवार दि. 21 ला नियोजन आयोगाचे माजी सदस्य रत्नाकर महाजन भगतसिंगांचा आर्थिक विचार व सध्याची आर्थिक स्थिती या विषयावर बोलतील. गुरुवार दि. 22 ला माजी सनदी अधिकारी धनराज वंजारी सत्यशोधक समाज दिशा व दशा या विषयावर विचार मांडतील. अंतीम पुष्प शुक्रवार दि. 23 मार्चला आयडिया ऑफ इंडिया विषयावर ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे विचार व्यक्‍त करतील. व्याख्यान मालेस नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्य संयोजक प्रदीप पवार यांनी केले. व्याख्यान माला विनाशुल्क आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)