आजच्या लोकशाहीत संसदीय कामकाजाची अधोगती- नारायण राणे

पुणे : विचारातून विकास घडवतील, अशा प्रकारचे वक्ते तयार होणे गरजेचे आहे. कोणत्याही विषयाला न्याय देणारा वक्ता होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवे. आजच्या लोकशाहीत संसदीय कामकाजाची अधोगती झाली आहे. पूर्वी जो दर्जा होता, तसा दर्जा आज राहिलेला नाही. त्यामुळे उत्तमप्रकारे अभ्यासपूर्ण विषय मांडणारे वक्ते होण्यासाठी तरुणांनी प्रयत्न करायला हवे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केले.

पुण्यातील न-हे मानाजीनगर येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस्च्या २३ व्या वर्धापनदिनानिमित्त प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल येथे सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी राणे यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

-Ads-

नारायण राणे म्हणाले, शिक्षण ही प्रगती आहे. शिक्षणाशिवाय श्रीमंती, प्रगती आणि उन्नती नाही. शिक्षणातून मिळणारे समाधान वेगळ्या प्रकारचे असते. अमेरिका हा जगातील पुढारलेला देश आहे. त्याठिकाणी आपल्याला पोहोचायचे असेल, तर चांगले शिक्षण, उत्पन्न वाढ आणि निर्यात वाढविण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आपण प्रत्येकाने देश आणि आपले राज्य आर्थिकदृष्टया सक्षम करण्याकरीता योगदान द्यायला हवे. त्याकरीता प्रत्येकाला दर्जेदार शिक्षण मिळणे देखील गरजेचे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)