आजचे युग गणित व विज्ञानाचे : आ. राजळे

शेवगावात 39 व्या तालुकास्तरीय गणित व विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

शेवगाव: आजचे युग गणित व विज्ञानाचे आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात गणित, विज्ञान व अध्यात्माला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण विज्ञानामध्ये मोठी प्रगती व संशोधन केले आहे. विज्ञानाला समाजाच्या उन्नतीची तसेच विध्वंसाची अशा दोन बाजू असतात. तेव्हां काय घ्यायचे ते मनुष्याने ठरवणे आवश्‍यक असल्याचे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले.
येथील त्रिमुर्ती शैक्षणिक संकुलात पंचायत समितीचा शिक्षण विभाग व तालुका विज्ञान गणित अध्यापन संघटना यांच्या संयुक्त विदयमाने 39 वे विज्ञान, गणित तालुकास्तरीय प्रदर्शनाचे उद्‌घाटन आमदार राजळे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परीषदेच्या उपाध्यक्षा राजश्री घुले होत्या. यावेळी जिल्हा परीषद सदस्या संगिता दुसंगे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, गटविकास अधिकारी अशोक भवारी, भाजपचे तालुकाध्यक्ष बापुसाहेब पाटेकर, त्रिमुर्ती पावन प्रतिष्ठाणच्या अध्यक्षा सुमती घाडगे, पंचायत समिती सदस्य कृष्णा पायघन, जे.एस. पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी बी.ए. कासार, ताराचंद लोढे आदी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी राजळे म्हणाल्या, संधीचा फायदा घेत मनुष्याने जगामध्ये क्रांती घडवलेली आहे. संशोधक व वैज्ञानिकांनी आपापल्या क्षेत्रामध्ये केलेल्या संशोधनाचा फायदा संपुर्ण देशाच्या विकासासाठी झालेला दिसून येतो. बालवैज्ञानिक घडवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद व पंचायत समितीने चांगले प्रयत्न केले. त्यामुळे तालुक्‍यातील बालवैज्ञानिक नक्कीच पुढे येतील. जगाच्या स्पर्धेमध्ये टिकायचे आहे. मोबाईल, टिव्ही व कॉम्प्युटरमुळे मुले बिघडणार नाहीत याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. सोशल व इलेक्‍ट्रॉनिक मिडीयामुळे आपली संस्कृती लोप पावते की काय अशी भिती वाटते. त्यामुळे मुलांनी पुस्तके वाचावीत, त्यासाठी घराच्या एका कोपऱ्यात पुस्तकांसाठी जागा ठेवा. त्याचा विदयार्थ्यांना नक्कीच फायदा होईल.

घुले म्हणाल्या, विदयार्थी घडवण्याचे व त्यांना प्रेरणा देण्याचे काम शिक्षक करतात. त्यांच्या पाठीवर थाप टाकून त्यांना पाठबळ दिल्यामुळे विदयार्थी काही तरी ध्येय ठेवून पुढे जात आहेत. जिल्हा परिषदेच्या उपक्रमामुळे तालुक्‍यातील तीन विदयार्थ्यांची इस्त्रोच्या सहलीसाठी निवड झाली. ही अभिमानाची गोष्ट आहे, विदयार्थी सुदृढ असेल तो घडेल यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने विदयार्थ्यांच्या आहारकडे लक्ष दिले आहे. यावेळी त्रिमुर्ती पावन प्रतिष्ठाणच्या अध्यक्षा घाडगे यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुकर काळे यांनी तर सुत्रसंचालन मुकूंद अंचवले यांनी केले. विज्ञान विभागाचे अध्यक्ष रामकिसन धुमाळ यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)