आजचा शिक्षक टेक्‍नोशाली – डॉ. गणपतराव मोरे

रेडा- आजचा शिक्षक हा अधिक टेक्‍नोशाली असून नवीन ज्ञान जास्त आत्मसात करणारा आहे. विचारवंताच्या मते तुरुगांची किंवा दवाखान्यांची संख्या कमी करावयाची असेल तर दर्जेदार शिक्षक व शाळांची संख्या वाढवली पाहिजे. जबाबदार शिक्षकाची भूमिका पार पाडून येणारे बदल स्विकारून शैक्षणिक गतीमानता निर्माण केली पाहिजे, असे मत पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. गणपतराव मोरे यांनी व्यक्त केले. इंदापूर तालुका कॉंग्रेस शिक्षक सेलच्या वतीने शहाजीनगर येथे तालुक्‍यातील गुणवंत मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना डॉ. गणपतराव मोरे, कृषी उत्पन्न बाजार समीतीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील, तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष ऍड. कृष्णाजी यादव यांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. माध्यमिक विभागातील 15 मुख्याध्यापक, 33 प्राथमिक शिक्षक, 33 माध्यमिक शिक्षक आणि माध्यमिक विभागातील 16 शिक्षिकेत्तर कर्मचारी आणि मुख्याध्यापक संघाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल, रेडकेवस्तीच्या जिल्हा परिषद शाळेस सभापती पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेच्या पदी निवड झाल्याबद्दल शिक्षकांना यावेळी गौरविण्यात आले. यावेळी सभापती विलासराव वाघमोडे, इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक समीतीचे अध्यक्ष ज्ञानदेव बागल,प्रा. सागर देवकर यांनी आपले विचार मांडले. यावेळी सभापती विलास वाघमोडे, इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक समीतीचे अध्यक्ष ज्ञानदेव बागल, प्रा. सागर देवकर, श्रीमंत ढोले उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)