आचार संहितेच्या धसक्‍याने निविदांची लगीनघाई!

  • लोणावळा नगरपरिषद : पावणेआठ कोटींची 27 विकास कामे

लोणावळा – पर्यटननगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यात नगरपरिषदेकडून 27 विविध विकास कामांच्या 7 कोटी 85 लाख रकमेच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या धास्तीने निविदांचा घाट घालण्यात आल्याचे बोलले जात आहे.

लोणावळा नगरपरिषदेलाही आगामी निवडणुकांचे वेध लागले असून, या पार्श्‍वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाकडून बांधकाम विभागाने विकासाचे नियोजन केले आहे. लोणावळा हे शहर पुणे आणि मुंबई या प्रमुख शहराच्या मध्यवर्ती ठिकाण आहे. या शहरात देशभरातून पर्यटकांची संख्या मोठी असते. पर्यटक वाढत्या संख्येमुळे स्थानिक प्रशासनाला पायाभूत सुविधा पुरविणे जिकीरीचे जात आहे. पुढील काही काळात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल. त्यापूर्वीच नगरपरिषदेकडून सुमारे पावणेआठ कोटींची निविदा प्रसिद्ध केल्या आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी विविध विकास कामांचा “नारळ’ फोडण्याचा घाट घालण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीतील पोलीस ठाण्यासमोरील हॉटेल श्रीकृष्ण ते ऑन वॉच कंपनीपर्यंत ते वांद्रे वकील येथील दोन्ही बाजूस गटार बांधणे, तुंगार्ली विभागातील जाखमाता उद्यान ते बोरकर गल्लीपर्यंत रस्ता डांबरीकरण करणे, खोंडगेवाडी येथील गटारी बांधणे, तुंगार्ली विभागातील प्रेम प्रकाश आश्रम समोरील रस्ता डांबरीकरण करणे, रामनगर येथील साने गुरुजीनगर व वडार वस्ती येथील कॉंक्रिट गल्ली बोळ करणे, नांगरगाव येथील फायर स्टेशन जवळ दगडी भिंत (गॅबीयन वॉल) बांधणे, तुंगार्ली सर्व्हे नं. 83 ते ऍड. पाटील घर ते कुमार हिल्स चौक मुख्य रोडपर्यंत गटार बांधणे, तसेच हा रस्त्यावरही डांबरीकरण करणे, वलवण राव कॉलनी येथील रस्त्यालगत गटार, भोमे वस्तीच्या रस्त्याच्या कडेने गटार बांधण्यात येणार आहे.

याशिवाय नगरपरिषदेच्या हद्दीत गवळीवाडा विभागातील पुणे-मुंबई महामार्ग ते सार्वजनिक शौचालयापर्यंत रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्यात येणार आहे. दुर्लब घटक कल्याणकारी योजनेतंर्गत 5 टक्‍के कैलासनगर स्मशानभूमी समोरील रस्त्यावर डांबरीकरण करण्यात येणार आहे. तसेच हनुमान टेकडी येथील अंतर्गत रस्त्यावर कॉंक्रिटीकरण करण्यात येईल. जुना खंडाळा राजू बाबा कॉलनी येथील अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणामुळे रस्ते चकचकीत होणार आहेत. याशिवाय गवळीवाडा येथील क्रीडांगणाकरिता 36 लाख 75 हजार रुपयांची दगडी भिंत उभारण्याचे काम करण्यात येणार आहे.

तुंगार्ली विभागातील म्हैसकर बंगलो ते सर्व्हे नं. 10 पर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे, भुशी येथील पंचशीलनगर येथील रस्त्याचे कॉंक्रिटीकरण आणि भागुजी न्हालवे घर ते रावजी मराठे घरापर्यंतचा नाला करण्यासाठी 23 लाख 87 हजार 533 रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. तसेच खोंडगेवाडी अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करणे, जुना खंडाळा इंदिरानगर येथील अंतर्गत रस्त्याचे सिमेंट कॉंक्रिटीकरण आणि अंतर्गत गटार व्यवस्था, भोमे वस्ती येथील रस्ते कॉंक्रिटीकरण करणे व गटार बांधणे, तसेच ठोंबरे वस्ती येथील रस्ते कॉंक्रिटीकरण आणि गटार बांधणे, तुंगार्ली पांगोळी येथील कोंडभर घर ते दीपक तारे घर दरम्यान गटर बांधणे या कामांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

अडीच कोटींचे शॉपिंग सेंटर
लोणावळा नगरपरिषदेचे विकास आराखड्यातील आरक्षण क्रमांक 66 आशीर्वाद हॉस्पिटल समोरील शॉपिंग सेंटर विकसित करण्यासाठी दोन कोटी 44 लाख 61 हजार 385 रुपयांची निविदा आहे. याशिवाय लोणावळा नगरपरिषद हद्दीतील शहरातील अंतर्गत रस्त्यांखेरिज ग्रामीण भागातील रस्ते आणि सांडपाणी व्यवस्थापनावर अधिक भर दिल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीच्या तोंडावर कोट्यवधींच्या विकास कामांच्या निविदा प्रसिद्ध करून सत्ताधाऱ्यांनी चुणूक दाखवून दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)