आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी दक्ष रहा

द्विवेदी : निवडणूक संनियंत्रण समिती

नगर: महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करणे, खर्चावर नियंत्रण ठेवणे, आर्थिक बळाचा दूरुपयोग टाळणे, मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या वस्तूंच्या वाटपावर अंकुश ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांनी दक्ष रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले.

-Ads-

द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समिती अंतर्गत असलेल्या तहसीलदारास्तरावरील समितीची बैठक जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीमध्ये निवडणूकीच्या काळात आर्थिक गैरप्रकार रोखण्यासाठी सर्व बॅंका, पतसंस्थांनी त्यांचेकडील माहिती देण्याकरिता विहित प्रपत्रे करुन देण्यात आलेले आहेत.

उमेदवार तसेच इतर व्यक्‍तीमार्फत दि. 26 नोव्हेंबरपासून एक लाखपेक्षा मोठ्या सर्व रकमांच्या व्यवहारांचे, वारंवार होणाऱ्या व्यवहारांची तसेच अन्य संशयास्पद आर्थिक व्यवहारांची माहिती त्याचप्रमाणे उमेदवारांच्या खात्यावरील व्यवहारांची माहिती लिड बॅंक आणि तालुका निबंधक यांच्याकडे एकत्रित करण्यात येणार आहे. या माहितीची तपासणी करुन यामध्ये संशयास्पद आढळणाऱ्या व्यवहारांची सखोल तपासणी होऊन कारवाई करण्यात येणार आहे. सर्व बॅंका, पतसंस्था यांनी निवडणूका प्रलोभनहीत होण्याकरिता सहकार्य करावे. या कामात कसूर झाल्यास संबंधीतांवर कारवाई करण्यात येईल,अशा सूचना द्विवेदी यांनी दिल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)