आचारसंहितेचे पालन काटेकोरपणे करा

कराड – येथील पालिकेची निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी नुकतीच बैठक झाली. या बैठकीत सर्व राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी हिम्मत खराडे यांनी केले.

मलकापूर पालिकेच्या बहुउद्देशीय इमारतीत ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस निवडणूक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेश चव्हाण, मुख्याधिकारी संजीवनी दळवी, वरिष्ठ निरीक्षक सर्जेराव गायकवाड, राष्ट्रीय कॉंग्रेसचे राजेंद्र यादव, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मीना बोरगावे, भाजपचे सूरज शेवाळे, शिवसेनेचे नितीन काशिद, मनसेचे दादा शिंगण, राष्ट्रवादीचे प्रमोद शिंदे यांच्यासह इतर अपक्ष उमेदवार व नागरिक उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी हिम्मत खराडे म्हणाले, उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे संगणक प्रणालीमध्ये भरलेलीच स्विकारली जाणार आहेत. जे उमेदवार आरक्षित जागेवरुन निवडणूक लढविणार आहेत. त्यांचे जात पडताळणीसाठी आवश्‍यक असणारे प्रमाणपत्र देण्यासाठी कक्ष लक्ष्मीनगर बहुउद्देशीय इमारत येथे करण्यात आले आहेत. निवडणुकीदरम्यान सकाळी 6 ते रात्री 10 या दरम्यान प्रचाराचा कालावधी राहणार आहे. हिम्मत खराडे यांनी आचारसंहितेबाबत मार्गदर्शन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)