आचारसंहिता चे पालन करावे – एस. बी. होले

कुरवली- येथील मारुती मंदिरात गणेश मंडळचे कार्यकर्ते आणि भवानीनगर औट पोस्टचे पोलीस उपनिरीक्षक एस. बी. होले यांनी गणेशोत्सवतील दक्षतेबाबत संवाद साधला. वालचंदनगर पोलीस स्टेशनअंतर्गत भवानीनगर पोलीस स्टेशन बीटमधील जांब तावशी, उद्घट कुरवली, मानकरवाडी, चिखली, पवारवाडी (ता. इंदापूर) गावातील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन कुरवली (ता. इंदापूर) या ठिकाणी करण्यात आले होते. यावेळी बोलताना पोलीस उपनिरीक्षक होले म्हणाले की, परिसरातील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वर्गणी गोळा करताना धर्मादाय आयुक्तांची परवानगी आवश्‍यक आहे. वर्गणीबाबत सक्ती अथवा जबरदस्ती करू नये. रात्री दहानंतर स्पीकर बंद ठेवण्यात यावा, मूर्तीचे संरक्षण करावे, वाहतुकीस आडथळा होऊ देऊ नये, विसर्जन मिरवणुकीत अनुचित प्रकाराबाबत दक्ष राहावे, मिरवणूकदरम्यान पोलीस सूचनांचे पालन करावे, आवाजाच्या मर्यादांचे (डेसिबल) उल्लंघन होऊ देऊ नये, अन्यथा त्या मंडळावर कारवाई केली जाईल. परिसरातील सर्व गणेश मंडळांना पोलीस स्टेशनने उत्सवाबाबत आचारसंहितांचे नियम दिले आहेत. त्याचे पालन करावे. कायदा आणि सुव्यवस्थेबाबतीत जागरूक राहून आचारसंहितेमधील स्पीकर आवाज, वर्गणी वसुली, विविध परवाने घेऊन त्यामध्ये असणाऱ्या नियमाचे पालन करावे. गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणूकदरम्यान कोणतेही अनुचित प्रकार मंडळाचे सदस्य अथवा कार्यकर्त्यांकडून होता कामा नये, यासाठी कार्यकर्त्यानी दक्षता घेतली पाहिजे. यावेळी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर बनकर, हवालदार वसंत वाघोले, पोलीस नाईक प्रकाश माने, पोलीस पाटील विलास कणसे आणि कुरवलीसह परिसरातील गणेश मंडळांचे कार्यकर्ते, पोलीस पाटील, सरपंच आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)