आचरण निर्मळ असावे- साध्वी उपप्रर्वतनी मंजुलज्योतिजी म.सा.

भोसरी- आपले आचरण निर्मळ पाण्याप्रमाणे असावे. जेव्हा आपण आपल्या जिभेवर नियंत्रण ठेऊन बोलण्याचा प्रयत्न करतो. आपल्या वाणीतून कोणासही द्वेष निर्माण होणार नाही, त्यांच्या मनावर दुःख होणार नाही, मानहानी होणार नाही, अशाच प्रकारची असावी. हे विचार साध्वी उपप्रवर्तनी मंजुलज्योतिजी म.सा. यांनी चातुर्मास प्रवचना दरम्यान व्यक्‍त केले. आपले आचरण शास्त्रात सांगितल्याप्रमाणे शुद्ध असावे. संत वचनाप्रमाणे “नाही निर्मळ जीवन काय करील साबण’ याचा प्रत्यत आपणास दिसून येतो. इंद्रधनुष्याप्रमाणे रंगीबिरंगी जीवन मोहक दिसते. कारण इंद्रधनुष्याची सुंदरता आकर्षितता व प्रकाशमानता ही मोरपिसांसारखी सर्वांना आकर्षित करते. त्याचप्रकारचे आपले आचरणही सर्वांना आवडले पाहिजे. आपल्या वर्तनामुळे कुटुंबात, समाजात वाढणाऱ्या समस्या निर्माण होऊ नये. यासाठीच शुद्ध वर्तणूक शुद्ध आचरण, शुद्ध वाणी ही सर्व सुखाचे आगर भारतीय संस्कृतीमध्ये मानली जाते, असेही त्या म्हणाल्या.

श्री चंदन विजेन्द्र पुण्यस्मृति दिवसानिमित्त विविध कार्यक्रम
भोसरी- येथील वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघात कवी रत्न चंदन मुनीजी महाराज व गुरुनी विजेन्द्र महाराज यांची पुण्यतिथीनिमित्त त्रिदिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात एकासना दिवस, 24 घंटे जाप, बेटी बचाओ नाटिका व महिला मंडळाच्या वतीने भक्‍तीसंगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नवकार महामंत्र 1008 वेळा लिहून तो आकर्षक स्वरूपामध्ये डिझाईन करून त्याचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड, नगर, शिरूर, दिल्ली व संगमनेर हरियानामधील 40 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सर्वांचा सत्कार करून त्यांना श्री संघातर्फे भेटवस्तू देण्यात आल्या.

ओजस्वी वक्‍त्या साध्वी वसुधाजी महाराज यांनी तरुणाई मध्ये धर्मभावना जागृतीसाठी करीत असलेल्या विशेष प्रयत्नांबद्दल ‘युवा प्रेरक’ ही पदवी प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला. उपप्रवर्तनी साध्वी मंजुलज्योती महाराज यांनी कवी रत्न चंदनमुनींजी महाराज व गुरुणींचे आपल्या जीवनातील योगदान सांगितले. कार्यक्रमाचे संयोजक श्री संघाचे अध्यक्ष सुभाष चुत्तर, सागर सांखला, गिरीश मुथियान, सुभाष डुंगरवाल, विजय कर्णावट, राजेंद्र चोरडिया, राजेंद्र बांठिया, शांतीलाल शाळ, अस्मिता गुगळे आदींनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)