आघाडीबाबत ४८ जागांसाठी आमची सकारात्मक चर्चा- अजित पवार

कोल्हापुर: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची परिवर्तन यात्रा आज कोल्हापुरात दाखल झाली. कोल्हापूर शहरात परिवर्तन यात्रेची सभा होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. आघाडीबाबत ४८ जागांसाठी आमची सकारात्मक चर्चा झाली आहे. ४४ जागांचा निर्णयही झालेला आहे, तर चार जागांबाबत चर्चा सुरू आहे. तणाव निर्माण न करता हे सरकार घालवण्यासाठी आम्ही एकदिलाने काम करू, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

दहा जानेवारीपासून सुरु झालेली ही परिवर्तन यात्रा आज कोल्हापुरात पोहोचली आहे. पुढचा टप्पा हा नगर, विदर्भातील गोंदिया, नागपूर, भंडारा, येथे होईल आणि या परिवर्तन यात्रेची सांगता २३ फेब्रुवारी रोजी परळी-बीड येथे होईल. असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://www.facebook.com/NCPKolhapurSpeaks/videos/780626602304460/UzpfSTMxMzU5NjYxNTQ0NDg0MjoxMzA0NDUyMzY5NjkyNTkw/?epa=SEARCH_BOX

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)