आगोती विकासाही एक नंबर करणार -माने

रेडा- इंदापूर तालुक्‍यातील आगोती नं 1 हे विकासात देखील एक नंबर करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी, ग्वाही पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे सभापती प्रवीण माने यांनी दिली. आगोती नं. 1 येथील ग्रामपंचायतमधील नवनिर्वाचित सदस्य व सरपंच यांचा आज (शनिवारी) प्रवीण माने यांच्या हस्ते इंदापूर येथे विषेश सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आगोतीचे नवनिर्वाचित सरपंच मोनाली विनोद दळवी, सदस्य अलका गुणवरे, लताबाई गोळे, सुनील शिंदे व ग्रमस्थ उपस्थित होते. प्रवीण माने म्हणाले की, इंदापूर तालुक्‍यातील निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये विकासकामांच्या जोरावर व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीने घवघवीत यश मिळाले आहे, असे त्यांनी नमूद केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)