आगीमध्ये भंगारातील जुन्या मोटारी भस्मसात

file photo

चाकणमध्ये गॅरेजला लागलेल्या आगीत जीवितहानी नाही

वाकी – पुणे-नाशिक महामार्गालगतच्या चाकण (ता. खेड) येथील पुरातन तळ्यालगत असलेल्या परदेशी यांच्या भंगार दुकानातील सुमारे दहा जुन्या मोटारींना अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. 15) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबतची माहिती अशी की, परदेशी यांचे तळ्यालगत भंगाराचे दुकान आहे. या दुकानातील काही दुचाकी आणि चार चाकी जुन्या वाहनांना शनिवारी (दि. 15) सायंकाळी चारच्या दरम्यान अचानक आग लागली. आगीने क्षणार्धात रौद्र रूप धारण केल्याने परिसरात आगीचे आकांडतांडव निर्माण झाले होते. गाड्यांचे टायर फुटल्याने मोठमोठे स्फोट झाले. आगीचे तांडव आणि धुरांचे लोट परिसरात पसरू लागल्याने आग लागलेल्या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाली होती. सबंधित दुकानातील कामगार, राजगुरुनगर आणि चाकण येथील अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी आग आटोक्‍यात आणण्याचे प्रयत्न तातडीने केल्याने आग अवघ्या तासाभरात नियंत्रणात आली. भंगारातील सुमारे दहा मोटारी या आगीत “स्वाहा’ झाल्याचे दुकानातील कामगारांनी सांगितले.

राजगुरुनगर नगरपरिषद आणि चाकण एमआयडीसीच्या दोन बंबांनी पाण्याचामारा करून ही आग तासाभरात आटोक्‍यात आणल्याने कुठलीही जीवित हानी झाली नाही. भंगार माल आणि जुन्या मोटारींचे यात मोठे नुकसान झाले असून, रात्री उशिरापर्यंत याबाबत चाकण पोलीस ठाण्यात या जुन्या मोटारींच्या गॅरेजचे मालक श्रीकांत परदेशी यांच्याकडून कुठलीही तक्रार देण्यात आली नव्हती.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)