आगीतून बचावली दीपिका

दीपिका जिथे रहाते, त्या वरळीतल्या बीमोंड टॉवरला बुधवारी मोठी आग लागली होती. ही आग का लागली, याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र सुदैवाची गोष्ट ही की जेंव्हा आग लागली होती, तेंव्हा दीपिका घरी नव्हती. दीपिका सध्या एका शुटिंगच्या निमित्ताने बाहेरगावी आहे. त्यामुळे या आगीतून ती अगदी सुखरूप बचावली आहे. मात्र दीपिकाच्या घराचे आणि ऑफिसचे या आगीत बरेच नुकसान झाले आहे.

दीपिका जरी यावेळी घरी किंवा ऑफिसमध्ये नव्हती, तरी तिचा स्टाफ मात्र उपस्थित होता. आग लागल्याचे समजताच फायर ब्रिगेड आणि आजूबाजूच्या व्यक्‍तींनी बिल्डींगमधील सुमारे 90-95 जणांना सुखरूप बाहेर काढले. त्यामध्ये दीपिकाच्या स्टाफलाही तातडीने बाहेर काढण्यात आले आहे, असे समजते आहे. दीपिकाचा फ्लॅट या बिल्डींगच्या 26 व्या मजल्यावर आहे आणि या बिल्डींगच्या 32 आणि 33 व्या मजल्यावरच्या डुप्लेक्‍स फ्लॅटला आग लागली होती. दीपिका सुरक्षित आहे हे समजल्यावर तिच्या चाहत्यांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दीपिका सध्या “द लाईव्ह लव्ह लाफ फौंडेशन’ या मनोरुग्णांशी संबंधित एनजीओचे काम करते आहे. या कामाच्या निमित्ताने तिने एक पोस्ट शेअर केली आहे. हॉलिवूडचा डिजईनर केट स्पेड आणि शेफ अँथनी बड्रेन यांनी अलिकडेच आत्महत्या केली आहे. त्या दोन्ही सेलिब्रिटीजच्या आकस्मित निधनामुळे तिने “गैरसमज’ होण्याच्या आजारपणाविषयी आपल्या पोस्टमध्ये सविस्तर लिहीले आहे. “प्रत्येक 40 सेकंदाला जगभरात एक व्यक्‍ती आत्महत्या करतो.’ अशी सुरुवात असलेल्या या पोस्टमध्ये दीपिकाने जागतिक आरोग्य संघटनेची आत्महत्या करणाऱ्यांची आकडेवारीही शेअर केली आहे. जेंव्हा आत्महत्या करणारा अस्वस्थ असतो, तेंव्हा सर्व जग मात्र आनंदी असते. मानसिक अस्वस्थ असलेल्या व्यक्‍तीच्या आजारावर व्यक्तीचा कंट्रोल असतो, असा मोठा गैरसमज निर्माण झाला आहे, असे तिने म्हटले आहे. मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्यांशी सातत्याचा संवाद आवश्‍यक आहे, असा तिच्या पोस्टचा निष्कर्श आहे. दीपिका स्वतःही काही वर्षांपूर्वी डिप्रेशनमध्ये होती, हे तिने जाहीर कार्यक्रमात कबूल केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)