आगामी 50 वर्षात सत्तेत राहण्याचे स्वप्न पाहा-अमित शहा यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

गाझियाबाद : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आहे. आगामी 50 वर्षात सत्तेत राहण्याचे स्वप्न पाहा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. तसेच निवडणुकीतील विजयाची कल्पना ही केवळ पाच वर्ष, दहा वर्ष, 15 वर्ष करु नका. तर ज्या प्रमाणे काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून प्रदीर्घकाळ ग्रामपंचायत ते पार्लिमेंटचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून राज्य केले. त्याच प्रमाणे 50 वर्ष सत्तेत राहण्याचा संकल्प करा, असेही अमित शहा म्हणाले.

“केवळ निवडणुकीत विजय मिळवणे, इतकेच आपले लक्ष्य असून उपयोग नाही. तर विकासाच्या प्रक्रियेत शेवटच्या घटकापर्यंत काम पोहोचले पाहिजे. गेल्या चार वर्षात मोदी सरकारने एकही काम असे केले नाही, ज्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांना अपमान सहन करावा लागेल. सरकारच्या कामामुळे कार्यकर्ते ताठ मान करुन जनतेत जात आहेत.”असे अमित शहा यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)