आगामी लोकसभेसाठी मोदी-शहा जोडगोळीला मिळाला चाणक्य !

नवी दिल्ली : अनेक राज्यांमध्ये असलेली सरकारविरोधी लाट (अँटी-इन्कम्बन्सी), विरोधकांमध्ये वाहू लागलेले एकीचे वारे आणि ‘मित्रपक्षांमधील नाराजीचा सूर यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांचे ‘मिशन २०१९’ कठीण झाल्याचे चित्र असतानाच, या जोडगोळीला एक चाणाक्ष जादुगार सापडल्याचे समजते. किंबहुना, २०१४ च्या निवडणुकीनंतर त्यांच्यापासून दुरावलेला जुना-जाणता शिलेदार पुन्हा भाजपाच्या गोटात दाखल झाल्याने त्यांना मोठंच बळ मिळाल्याचे बोलले जात आहे. हा जादुगार दुसरा-तिसरा कुणी नाही, तर निवडणूक रणनीतीचा बादशहा प्रशांत किशोर आहे.

निवडणूक जिंकणे ही एक कला आहे आणि प्रशांत किशोर यांनी त्यातील ‘मास्टरी’ सिद्ध केली आहे. भारतीय मतदारांची नाडी त्यांनी अचूक ओळखली आहे. त्यामुळे २०१२ची गुजरात विधानसभा निवडणूक असो किंवा देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारी २०१४ची लोकसभा निवडणूक; प्रशांत किशोर यांनी चमत्कार करून दाखवला होता. भाजपाच्या या ऐतिहासिक विजयानंतर, अमित शहा आणि त्यांचे काहीतरी बिनसले होते. त्यामुळेच बिहार विधानसभेच्या निवडणुकीत, त्यांनी मोदी-शहांऐवजी नितीश-लालूंसाठी रणनीती आखली होती आणि त्यांना सत्तेपर्यंतही पोहोचवले होते. त्यानंतर, हा राजकीय चाणक्य काहीसा अपयशी ठरलाय, पण आता नव्या जोमाने तो ‘घरवापसी’साठी सज्ज असल्याचे कळत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)