आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्रित होणार ?

नवी दिल्ली : पुढील वर्षी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रितपणे घेण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने पावले उचलायला सुरुवात केली असल्याचे दिसत आहे.  कारण आगामी लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकत्रित घेतल्या जाऊ शकतात का, याबाबत केंद्र सरकार निवडणूक आयोगाचे मत जाणून घेण्याच्या प्रयत्नात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. यासाठी विधी आयोग निवडणूक आयोगापुढे आपले म्हणणे मांडणार आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाचे म्हणणे जाणून घेतले जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, विधी आयोग २०१९ आणि २०२४ मध्ये दोन टप्प्यांमध्ये निवडणुका घेण्याची शिफारस करू शकतो अस बोलले जात आहे. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विधी आयोग विधी मंत्रालयाला आपला अहवाल सादर करण्याची शक्यता आहे. सरकारचा थिंक टँक समजल्या जाणाऱ्या नीती आयोगाने एकत्रित निवडणुका घेण्याची शिफारस केली असून त्यावरही निवडणूक आयोगाचे मत मागवले गेले आहे.

निवडणूक आयोगाने एकत्रित निवडणुका घेण्याबाबत पुढील महिन्यात आपले मत द्यावे असे सरकारचे म्हणणे असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यानंतरच एकत्रित निवडणुका घेण्याविषयी सरकार ठोस निर्णय घेऊ शकणार आहे. सरकारच्या ‘एक राष्ट्र एक निवडणूक’ या संकल्पनेला आकार देण्यासाठी प्रयत्नांचा एक भाग म्हणून विधी आयोगाने पुढील वर्षी लोकसभा आणि विधानसंभांच्या निवडणूका एकाचवेळी घेण्याची शिफारस केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)