आगामी लोकसभा निवडणूकीत कोट्यवधींचा होणार खर्च – सेंटर फॉर मीडिया स्टडिज

नवी दिल्ली :  भारतात निवडणुका आल्या म्हणजे राजकारण्यांपासून सर्वसामान्य जनतेपर्यंत दिवाळी साजरी केली जाते  असे चित्र दिसते कारण खुर्ची मिळवण्यासाठी  सर्वच पक्ष पाण्यासारखा पैसा उधळतात. त्यातच आता एक अहवाल समोर आला आहे ज्यात आगामी लोकसभा निवडणुकीत देशातील एकूणच पक्ष सत्तेसाठी कोट्यवधी रुपयांची उधळण करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

सेंटर फॉर मीडिया स्टडिजने हा अहवाल सादर केला आहे. ज्यात आगामी निवडणुकीचे अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भारतात 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या कॅम्पेनिंगसाठी जवळपास 5 अब्ज डॉलर म्हणजेच 33 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आला होता, जो अमेरिकेमध्ये 2012 च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या कॅम्पेनिंगसाठी करण्यात आलेल्या खर्चापेक्षा जास्त आहे. ज्यात 4 अब्ज डॉलर म्हणजेच 27 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. अमेरिकेनं 2016च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या कॅम्पेनिंगसाठी 6.8 अब्ज डॉलर म्हणजे 44 हजार कोटी रुपये खर्च केले होते. त्यामुळेच भारत 2019च्या लोकसभा निवडणुकीत अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीवर होणा-या खर्चापेक्षा जास्त खर्च करणार आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीतील खर्चानुसार भाजपाने निवडून येण्यासाठी 714 कोटी रुपये खर्च केला आहे. तर काँग्रेसने 516 कोटी रुपये खर्च केले होते. राष्ट्रवादीने 51 कोटी रुपये खर्च केले होते. तर बीएसपीने 30 कोटी रुपये निवडणुकांवर उधळले होते. तर सीपीएमने 9 कोटी रुपये खर्च केले होते, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)