आगामी निवडणुकीत कोणतीही लाट नसेल : प्रशांत किशोर 

विजयासाठी मोठी आघाडी गरजेची 

पाटणा: 2019 मध्येही कोणत्याही एकट्या पक्षाला जिंकणे सहज शक्‍य नाही. त्यामुळे विजयासाठी मोठी आघाडी गरजेची आहे. पण या आघाडीचा काहीतरी उद्देश असला पाहिजे. त्याची दिशा निश्‍चित हवी, असे मत एकेकाळी भाजपाचे निवडणूक रणनीतीकार आणि आताचे संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी व्यक्त केले आहे.

-Ads-

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर म्हणाले, 2014पासून आतापर्यंत राजकीय परिस्थिती बदलली आहे. आता लोक वस्तुस्थिती आणि दिलेल्या आश्वासनांवर बोलू इच्छितात. लोकानुनयी आश्वासने त्यांना नकोत. त्यामुळे आगामी निवडणुकीत कोणतीही लाट नसेल. ही निवडणूक छोट्या-छोट्या मुद्यांवर लढली जाईल. 2019मध्ये लोक उमेदवारांना पाहून मतदान करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील मोठे नेते आहेत. पण 2014 सारखी लाट आता थोडी अडचणीत असल्याचे दिसत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत सध्या तरी भाजपा आघाडीवर आहे. पण निवडणुकांचे निकाल हे 10 ते 12 दिवसांत बदलतात. जर आज निवडणूक झाली तर भाजपाच सर्वांत मोठा पक्ष असेल यात शंका नाही. पण एकट्या भाजपाला 272 जागा मिळणे कठीण असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.

तसेच निवडणूकीत डिजिटल प्लॅटफॉर्मची भूमिका खूप महत्त्वाची असेल. 2014मध्ये देशात 4 ते 5 कोटी स्मार्टफोन्स होते. तीच संख्या आता वाढून 35 ते 40 कोटीपर्यत पोहोचली आहे. तरीही देशातील 50 टक्के मतदार सोशल मीडियापासून दूर आहे. पण सोशल मीडियाची पुढील निवडणुकीत महत्त्वाची भूमिका असेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)