आगामी निवडणुका युती करूनच लढवणार

चंद्रकांत पाटील : मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे दुरुस्तीची पाहणी
सिंधुदुर्ग – आगामी काळात होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका शिवसेना-भाजप युती करून लढवणार आहेत. शिवसेनेसह सर्व मित्र पक्ष आणि आले तर राजू शेट्टी यांनाही पुन्हा सोबत घेऊन पुढच्या निवणुका लढवू, असे सुतोवाच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

ते सिंधुदुर्ग जिल्ह्यतील सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. तत्पूर्वी त्यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे दुरुस्तीची पाहणी केली. यावेळी दीपक केसरकर, राजन तेली, अतुल काळसेकर, प्रमोद जठार, महेश सारंग, मनोज नाईक, मंदार कल्याणकर आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, गणेश उत्सव काळात पनवेल ते झाराप रस्त्यावर बांधकाम विभाग पेट्रोंलिग करणार आहे. प्रत्येक पथकाकडे 50 कि.मी.चा परिसर देण्यात येणार आहे. तसेच आंबोली चौकुळला भेडसावणाऱ्या कबुलायतदार गावकर प्रश्नासंदर्भात लवकरच तोडगा काढू. काही गोष्टी तांत्रिक व न्यायालयीन कामात अडकल्या आहेत. मात्र यावर विचार करण्यासाठी खास समिती बसविण्यात आली आहे, असे पाटील यांनी सांगितले. तसेच मुंबई-पुणे मार्गे कोकणात येणाऱ्यासाठी चाकरमान्यांना प्रवास टोल फ्री असेल. तसेच मुंबई-गोवा महामार्गाचा दौरा हा खरोखरच समाधानकारक आहे, असेही त्यांनी यांवेळी सांगितले.

चंद्रकांत पाटलांची ऑफर
युतीमधील मित्रपक्षांसोबत कसरत करत चार वर्षे सत्तेत आहोत. पुढील वर्षही पूर्ण करू. तुम्ही एका दिवसासाठी भाजपाचे नेते व्हा, मग या सर्व पक्षांना कसे सोबत घेऊन पुढे जावे लागते हे तुम्हाला कळेल, अशी गंमतीशीर ऑफर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना देऊन टाकली. तसेच एका दिवसासाठी भाजपाचे नेते व्हा. शिवसेना, भाजप, आरपीआय, जानकर, खोत, राजू शेट्टी यांचा समतोल साधत कसे पुढे जावे लागते हे लक्षात येईल, असे पाटील म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)