आगामी निवडणुकांसाठी भाजपचे सातारा जिल्ह्यात मायक्रो प्लॅनिंग

सातारा -आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी भाजपचे सातारा जिल्ह्यात मायक्रो प्लॅनिंग सुरू झाले आहे . सातारा जिल्हा कोअर कमिटीच्या प्रभारी म्हणून नीता केळकर यांना जवाबदारी देण्यात आली असून जिल्ह्यात 2433 बूथ बांधणीचे उद्दिष्ट निश्‍चित झाले आहे .नऊ सदस्यीय कोअर कमिटीची पहिली बैठक मंगळवारी येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली . यावेळी काही समित्यांची रचना आणि झालेले निर्णय याची माहिती जिल्हा संयोजक भरत पाटील व नीता केळकर यांनी संयुकत रित्या पत्रकार परिषदेत दिली .

केळकर पुढे म्हणाल्या हातकणंगले, कोल्हापूर , सांगली व सातारा लोकसभा मतदारसंघासाठी चार स्वतंत्र प्रभारी नेमण्यात आले आहेत. माझ्याकडे सातारा जिल्ह्याची जवाबदारी सोपवण्यात आली आहे . आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेउन जिल्हा परिषद गट व विधानसभा मतदारसंघ निहाय 2433 बूथ बांधणी व त्याचे अ, ब, क असे वर्गीकरण करण्याचे नियोजन आहे . अ वर्ग बूथमध्ये 25 सदस्य ब वर्ग बूथमध्ये 15 सदस्य व क वर्गमध्ये 10 सदस्य असे नियोजन आहे . कराड दक्षिण मध्ये 300, कराड उत्तर मध्ये 333, पाटणमध्ये 396, सातारामध्ये 426 वाईमध्ये 439, कोरेगावमध्ये 340, फलटणमध्ये 338, व माणमध्ये 354 बूथचा समावेश आहे . या बूथच्या मतदारसंघ निहाय बैठका एक सप्टेंबरपासून सुरू झाल्या आहेत .पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बात, जनधन योजना, मुद्रा योजना, शेतकऱ्यांना कर्जमाफी, अनेक योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचवणे हे उद्दिष्ट आहे .

साताऱ्यात लोकसभेसाठी पक्षांर्तगत अनेक इच्छुक नावे आहेत . मात्र त्याचा खुलास आत्ताच करता येणार नाही असे नीता केळकर यांनी सांगितले . केळकर यांनी दोनच दिवसापूर्वी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली होती . मात्र ती भेट राजकीय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले . उदयनराजे यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चाबाबत त्यांना छेडले असता त्या म्हणाल्या भाजपचा राजकीय इंटेक मोठा आहे. उदयनराजे यांच्या पक्ष प्रवेशाचा निर्णय धोरणात्मक आहे प्रभारींना जिल्हानिहाय मायक्रोप्लॅनिंगचे आदेश आहेत . शासनातर्फ जिल्हयातील अडीच लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली. तर मातृ योजनेचे जिल्ह्यात पन्नास हजार सभासद झाल्याचे केळकर म्हणाल्या . कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेवर त्यांनी जोरदार टीका केली . राजकीय नैराश्‍यातून ही यात्रा कॉंग्रेसने काढली आहे . भाजपवर टीका करण्याचा त्यांच्याकडे कोणताच मुद्दा नाही . अशा कोणत्याही यात्रांनी भाजपला कोणताही फरक पडणार नाही असे केळकर ठामपणे म्हणाल्या .

भाजपची कोअर कमिटी पुढीलप्रमाणे – प्रभारी – नीता केळकर , सहाय्यक – विक्रम पावसकर, भरत पाटील, अनिल देसाई, मनोज घोरपडे, दीपक पवार, अविनाश फरांदे, सुवर्णा पाटील, कविता कचरे, 2 ) संयोजक- भरत पाटील 3 ) कायदा सेल- ऍड प्रशांत खामकर, अमित कुलकर्णी , सोशल मिडिया – दिग्विजय सूर्यवंशी, संदीप भोसले, प्रिंट मिडिया – अनिल भोसले, अविनाश फरांदे, लाभार्थी सूची- सुवर्ण पाटील, विकास गोसावी, कविता कचरे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)